स्वर्गीय कोकण
स्वर्गीय कोकण
माझ्या या कोकणाची
गोष्टच एकदम न्यारी
पाहून स्वर्गीय सौंदर्य
दंग झाली सृष्टी सारी
हिरवे उंच उंच डोंगर
नद्या खळाळणाऱ्या
मुसळधार पाऊस
धारा कोसळणाऱ्या
मन जाई भुलून पाहता
आंब्याची गर्द वनराई
प्रसन्न करी या मनाला
सुंदर तलम हिरवाई
समुद्रकिनारीच्या लाटा
येई रोज भरती ओहोटी
पर्यटक खूप भेटी देती
हे सौंदर्य पाहण्यासाठी
असा हा स्वर्गीय कोकण
डोळे भरून एकदा पहावा
बघून सौदर्य अलौकिक
हर्ष मोठा मनाला या व्हावा
