हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
1 min
367
जीवनातील अनमोल
बालपणाचा असे क्षण
आनंदाने खूप भरलेला
मनातला प्रत्येक कण
नकळत केलेल्या कधी
निरागस अल्लड खोड्या
पावसात चिंब भिजताना
केल्या कागदाच्या होड्या
माहित नव्हता स्वार्थ
मन निरागस निर्मळ
सुखाचा सुंदर झरा
नव्हती वेदनेची झळ
नंतर रोजच आठवे
बालपणाचे मुक्त जग
सुंदर आठवणीने त्या
जीवाची होई तगमग
खरच आता वाटते
पुन्हा लहान व्हावे
स्वच्छंद पुन्हा जगण्या
बालपण परत यावे
