समृद्ध कोकण
समृद्ध कोकण
1 min
272
हिरवागार हा कोकण
ऊन पावसाचा खेळ
सृष्टी सौंदर्याचा नटला
इथे अलौकिक खेळ
......................................
नेसला हिरवागार शालू
धरती सुंदर ही नटली
मनमोहक सौंदर्याने ही
. दाटी झाडांची दाटली
......................................
आंबा फणस माडांची
हिरवीगार येथे वनराई
. वेड्या मना भुरळ घाली
इथली सुंदर हिरवाई
