मृदगंध पावसाचा
मृदगंध पावसाचा
1 min
136
भरूनी आले मेघ
कोसळती सरी
मृदगंध पावसाचा
सुगंध दाटतो उरी
बेधुंद या जलधारा
चिंब भिजली अवनी
अनुपम सृष्टीसौंदर्य
सुख मावेना नयनी
थेंब पडती टपोरे
जणू चमके मोती
शहारे झाडे वेली
चिंब ओले होती
ऊन पावसाचा हा
चाले नभात खेळ
हर्ष उल्हासित सारे
आनंदाची आली वेळ
सप्तरंगी इंद्रधनुष्य
आकाशी छान खुले
पावसाच्या सरीसंगे
मन बेभान हे डुले
