तू
तू
बोलण्या बोलण्यातून हळुवार समजत गेलास तू
शब्दाशब्दातून माझ्या उलगडत गेलास तू
जेव्हा जेव्हा मी मागितले, सगळं काही देत गेलास तू
होतेच रे मी वेडी तुझ्यासाठी
वेड माझं फक्त समजून घेतलेस तू
काहीच नव्हते माझ्याकडे तुला देण्या सारखे,
पण कधीच काही मागणं केले नाहीस तू
सारे काही मला देऊन रिक्त मात्र झालास तू
तू न मागता देत राहिलास, ना कधी मला नाराज केलेस तू
असंही प्रेम असतं निस्वार्थी, जगाला हे दाखवून दिलेस तू
नात्याला नाव गरजेचे नसते, हे सतत जाणवून दिलेस तू
मैत्री की प्रेम याच वादात अडकलो मी आणि तू
खूप शोधले रे मी तुला वेड्या पण नाही सापडलास तू
कदाचित गुंतून पडला असशील माझ्या कवितेच्या शब्दात तू!!

