तू येशील का?
तू येशील का?
झाडावरल्या कळ्या उमलत्या
पाहावया तू येशील का?
बागडणाऱ्या फूलपाखरामागे
धावायला तू येशील का?
सूरपारंब्या खेळताना
लांब झोके घेशील का?
गाभूळलेल्या चिंचा पाडून
चव देत खाशील का?
बर्फाचा गोळा खात खात
टायरचं चाक पळवशील का?
स्वतःचं वय विसरून
लहानांच्या गोष्टीत रमशील का?
आठवणीतली सारी मस्ती
पुन्हा नव्याने अनुभवशील का?

