तू फक्त हो म्हण
तू फक्त हो म्हण
षडाक्षरी काव्य
२४ ओळींची रचना (६ कडवी)
तू फक्त हो म्हण
मी आहेच ना गं
मी आसुसलेला
प्रित फुलांसाठी
मी रांझा तू हीर
तू प्रीती मी प्यार
झेलीन गं वार
फक्त तुझ्यासाठी
किती वर्षे झाली
पाहतोय वाट
देशील ना मज
आयुष्याची साथ
तू शुक्राचा तारा
मी वादळ वारा
सांभाळशील ना
तुझ्या पदरात
तुझ्याविना सुने
माझे दिनरात
दे हाती हात
दे जन्माची साथ
तुझी माझी जोडी
संसाराची गोडी
चाखू थोडी थोडी
चॉकलेटा परी