तू नसताना
तू नसताना
तू नसताना काहीतरी
हरवल्यासारखं वाटतं
काहीतरी चुकीचं
ठरवल्यासारखं वाटतं || 0 ||
संपत आलं सारं असं वाटतं
जिवनाची संपलेली यात्रा वाटते
श्वास साथ देत नाहीत हृदयाला
श्वासाची अंतिम यात्रा वाटते
कुणीतरी मला
गुदमरवल्यासारखं वाटतं
काहीतरी चुकीचं
ठरवल्यासारखं वाटतं || 1 ||

