तू माझी
तू माझी
मी श्वास तुझा अन्
धडकन तु माझी
मि स्नेह तुझा अन्
प्रीती तु ग माझी
मी पंख तुझे अन्
भरारी तू माझी
मी सूर्य तुझा अन्
सावली तू माझी
मी अभंग तुझे अन्
रचना तू माझी
मी गर्व तूझा अन्
शान तू माझी
मि राजा तुझा अन्
राणी तू माझी
मी आकाश तुझा अन्
धरती तू माझी
मि पाणी तुझे अन्
तहान तु गं माझी
मी प्रियकर तुझा अन्
तु प्रेयसी गं माझी
मि शब्द तुझे अन्
भावना तू माझी
मि गती तुझी अन्
लय तू माझी
मी वात्सल्य तुझे अन्
माय माऊली तू माझी
मी आयुष्य तुझे अन्
जिवन प्रणाली तू माझी
मि कवि तुझा अन्
"मार्शल" कविता तू माझी

