STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

तू ही लढ...

तू ही लढ...

1 min
274

तू ही लढ आता

भीत नको जाऊ

सबला आहेस

जे होईल ते पाहू....!! १!!


तोडून दे हाती

छेडणारे हात

कशाला भितेस

तोडून दे दात......!!२!!


अन्यायाचा तू ही

प्रतिकार जरा

तेंव्हाच येईल

अर्थ खराखुरा.....!!३!!


मान अपमान

नको आता साहू

लढायला शिक

पुढचे ते पाहू.....!!४!!


जिजाऊ, सावित्री

अहिलेचा बाणा

हिंमतीने लढा

इतिहास जाणा....!!५!!


जुलूम,अन्याय

फोड तुझी वाचा

रणरागिणी तू

बदल तू ढाचा....!!६!!


आजची वाघीण

नको तू घाबरू

आव्हान पेल तू

नको तू हादरू.....!!७!!


नको गर्भपात

उठव आवाज

पोलिस स्टेशन

गाठ तू ही आज.....!!८!!


मुलगा मुलगी

ही एकसमान

दोघांनाही तूच

शिकवावे छान....!!९!!


अनिष्ट प्रथा दे

आता लाथाडून

पाळेमुळे त्याची

टाक उखडून.....!!१०!!


उद्योग करूनी

स्पर्धेत तू टीक

व्यवहारी ज्ञान

तू ही जरा शिक....!!११!!


संसाररथाची

तूच गे सारथी

तुझ्या पोटी जन्मे

रथीमहारथी.......!!१२!!


मायेची ममता

प्रेमाचा सागर

नारीशक्ती थोर

करूया जागर.....!!१३!!


दाहिदिशा मुक्त

तू ही लढ जरा

नारीरूपी शक्ती

अर्थ तोच खरा....!!१४!!


नानाविध रूपे

तू वात्सल्यरूप

आई,आजी कन्या

प्रेमळ स्वरूप.....!!१५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational