तू अशी जवळी रहा
तू अशी जवळी रहा
विरह नको आपल्यात
आता एकही क्षणाचा
रंगू दे प्रीतीचा खेळ
समजून घे कोलाहल मनाचा
सगळे निजले आता
आहे फक्त निरव शांतता
लबाड चंद्रही ढगाआड झाला
नको पडू देऊ कोणतीच भ्रांताता
आपल्या मिलनात माझे
शरीर तुलाच अर्पिले
तुझ्या बाहुत विसावलो
अवघ्या जीवनाचे सुख कल्पिले
प्रणयाची आस लागली
सगळी रात्र झाली धुंद
तुझ्याच ओढीने वाटे
अवघे वातावरण कुंद
नकोत खेळ आभासांचे
सोडूनि ये हे फसवे बंध
वाट फुलू दे मोहरत्या क्षणांची
बघ, दरवळे, रातराणीचा गंध
तुझ्या कुशीत शिरून
गात्र माझी भिजू दे
या निशेच्या समवेत
तुझ्या मिठीत निजू दे
नजीक तुझ्या आलो मी
खुलली कशी कळी पहा
आपल्या अनेक रासक्रीडांसाठी
तू अशी जवळी रहा

