तू असाच बघ निःशब्द
तू असाच बघ निःशब्द
तू असाच बघ
तटस्थ स्थिर निःशब्द
उरलेल्या नात्याला
तुम्हीच केला प्रारब्ध
तू असाच बघ निःशब्द .
तालबद्ध अधरामागे
दाटी आहे शब्दांची
डोळ्यांतून ओसंडते
दर्पण जणू ह्रदयाची
तरीही तू असाच बघ निःशब्द .
जपला आहे प्रत्येक क्षण
हृदयाच्या कडेकपारी
कान्हा साक्ष देतो तूच
अडकून जबाबदारीत
तरीही तू असाच बघ निःशब्द .
ठेवला तेवता दिवा
तो चंद्र पूर्णिमेचा
श्वास तो श्वासातला
जागरणी निशांतला
तरीही तू तसाच बघ निःशब्द.
एकदा तरी बघ
मागे वळून बोलका
होवून ,दिसेल क्षण तुला
तसाच माझ्या डोळ्यातला
तेव्हा मात्र तू असाच बघत निःशब्द.
तसाच टीप क्षण न क्षण
स्तब्ध वाचातला
तसाच जप क्षण न क्षण
अबोल प्रीतीतला
तू असाच बघ निःशब्द.