तू आणि तुझी आठवण
तू आणि तुझी आठवण
अंधारलेली वेडी रात्र
चांदण्यांसोबत होती रेंगाळत
चुकचुकत होती तुझी आठवण मनात
जेव्हा अंथरुणात पडलो होतो पेंगत
असंख्य विचारांनी मनात माझ्या
घातले होते थैमान
तुझ्या एका सुंदर झलकेने
माझं हरवून टाकले होते भान
आठवणीत तुझ्या डुंबून गेलो
सतत तुझाच विचार करत होतो
विसरून स्वतःला मी
मी माझाच उरलो नव्हतो
तुझ्या सौंदर्याच्या अदेने
हालेकेच काळजाचा ठाव घेतेस
वेड्या माझ्या मनाला
प्रेमाचा गोड घाव देतेस

