STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Romance Others

3  

Prof. Shalini Sahare

Romance Others

तू आणि पाऊस

तू आणि पाऊस

1 min
1.0K

तू मात्र वळवा सारखा  

असा अवचितपणे येतोस 

आलास की कोण कोण

तारांबळ होते म्हणून सांगू 

मग माझं गात्र नं गात्र 

चिंब करून जातोस 

किती दंगा किती अवखळ

सगळच कसं अनपेक्षित 

अंग अंग रोमांचित

अन पुलकित करून जातोस

पण तू नेहमी असाच का येतोस ?

आणि येतो न म्हणता ही 

असाच का जातोस 

तू मात्र वळवसारखा 

असा अवचितपणे येतोस.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance