तू आणि मी..
तू आणि मी..


कातर संधीकाल
थरथरता भवताल
नक्षी सुरकुत्यांची
तुझे अन माझे गाल

सोबत तरीही चिरकाल
होता कठीण भूतकाल
हात तुझा असता हाती
मी धनवान, नसे कंगाल
लोटला मागे किती काल
विझली न ही प्रीतमशाल
आता यावा कुशीत तुझ्या
मृत्युही मग जरी खुशाल...