STORYMIRROR

UMA PATIL

Tragedy

3  

UMA PATIL

Tragedy

तुटलेली पतंग

तुटलेली पतंग

1 min
502


तुटलेली पतंग



काय होईल या पतंगाचे ?

कुठे जाईल ही तुटलेली पतंग ?

रंगीबेरंगी आयुष्य होते तिचे

पण आता झाले सर्वच बेरंग... १



रोज रस्त्यावर कितीतरी

पसरती तुटलेल्या पतंगी

दोर कापता तुटल्या त्या

रंगल्या ना कोणत्या रंगी... २



आकाशात भरारी घेत असतांना

कोणीतरी अचानक कापला दोर

कळेना कसा अन् केव्हा लागला ?

बिचाऱ्यांच्या नाजूक जीवाला घोर... ३



गुलाबी, पिवळ्या, लाल, आकाशी

रंगीबेरंगी पतंगांचे रंग हजार

पण एकदा तुटल्यानंतर मात्र

पतंगी दिसू लागतात बेजार... ४



पतंग उंच उडत असतांना

गळ्याभोवती मांजा आवळला

उगवण्याआधीच असा कसा

नभीचा नवा सूर्य मावळला... ५



पावसात लुप्त होतात

फाटून होतात जीर्ण

मातीत जातात मिसळून

पतंगी दिसतात विदीर्ण... ६




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy