STORYMIRROR

Pandit Warade

Classics Inspirational Others

3  

Pandit Warade

Classics Inspirational Others

तुफान बाकी आहे

तुफान बाकी आहे

1 min
205

हृदयामध्ये धडधडणारे तुफान बाकी आहे

आभाळाशी अन मातीशी इमान बाकी आहे


आयुष्याचा हिशेब आता मांडून झाला सारा

पापाचे पुण्याचे जुळणे प्रमाण बाकी आहे


सुंदर जग हे डोळे भरून पाहून झाले आता

पोचायाची अंतिम जागा स्मशान बाकी आहे


ती येण्याने दवात भिजला सुगंध मनात भिनला

आली निघून गेली, स्मृतीचे निशाण बाकी आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics