तुमचा तिरंगा
तुमचा तिरंगा
*हरवले ते दिवस*
*हरवली पाखरे सारी,*
*चिवचीवाट कानी पडेना*
*कशी झाली किमया न्यारी।।*
*आसुसली ही शाळा*
*वर्ग ही बघतोय वाट,*
*चिमुकल्या पावलांचा*
*पाहण्या पुन्हा थाट।।*
*स्पर्श तुमचा भिंतीना*
*अन मैदानावर नाचणारे पाय,*
*सर्व पुन्हा हवय मला*
*आणखी हव काय ?*
*बागड़णारे स्वच्छंद फुलपाखरे*
*बागेत या ना तुम्ही पुन्हा,*
*कोणी रागवत नाही आता*
*तुमच्या विना हा बाग सुना।।*
*नजर माझी शोधते तुम्हा*
*नयनी अश्रुच्या धारा,*
*स्वातंत्र्यदिनी फडकण्यासाठी*
*वाट पाहतोय तुमचा तिरंगा*
*अन परिसर सारा।।*