STORYMIRROR

Santosh Jadhav

Romance

4  

Santosh Jadhav

Romance

तुला

तुला

1 min
374

तुला काय ऐकायचे?

मला काय सांगायचे?

गाली हास्य गुलाबी,

पापण्यांनी का लवायचे?


थोडे तू लाजायचे,

थोडे मी बुजायचे

जवळ येत मिठीत,

आडोशे सारे गाजवायचे


ओठांनी मग ओठांना,

अलगद असे चुंबायचे

मिठीत एकमेकांच्या दोघे,

बराच वेळ थांबायचे


लाजेचे तुझे कुंपण,

तू सखे तोडायचे

मिलनाचे हे क्षण,

सैल असे सोडायचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance