तुला पाहताना
तुला पाहताना
स्वप्नरंगी तुला पाहताना
तु स्वप्न होऊन माझ्या जीवनी आलास
मिठीत तुझिया विसावून
जीव माझा हा वेडापिसा झाला
तुजं भेटल्या त्या क्षणापासून
न माझी मी उरले आता
देह बेभान मन धुंद
दिवसरात्र विचारांत तुझ्या चं
न दिसतो ऋतु कुठलाही मला
जग माझे तु आहेस
तुझ्यासाठी सजताना
छेड काढतो माझी
हा लहरी वारा मधेमधे
आहे खूप चं रंजक गोष्ट आपल्या प्रेमाची
अलिकडे तुझा चं ध्यास मला असतो
कसे सांगू तुला
माझ्या प्रत्येक श्वासात तु सामावतोस

