तुला काहीतरी सांगावसं ..
तुला काहीतरी सांगावसं ..
तुला काहीतरी सांगावसं
मनात बऱ्याचदा
येऊन गेलं सांगणार
होती खूप काही
शब्दावाचुन राहून गेल
रातराणी उमलावी तसा तू उमलतोस
माझ्या मनात मनापासून दरवळतोस
खरच सांगू तुला! मला तू खुप आवडतो..
रात्र रात्र जगावसं वाटतं
तुझ्या आठवणीत
क्षण-क्षण रडावस वाटत
तुझ्या आठवणीत
तुझ्यासाठीच जगते
मी हे ओरडून ओरडून
तुला सांगावसं वाटतं..
रम्य त्या आठवणीत तुझ्या सदैव रमावस वाटतं
इतके प्रेम केलेस तू माझ्यावर
की आयुष्यभर तुलाच पहावसं वाटतं
तू आहेस म्हणून मी आहे
तुझ्या शिवाय जीवन अपूर्ण आहे
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तू शेवट आहे
तुला हे नेहमी पटवून द्यावस वाटतं
तुझं हसणं, तुझं रुसणं
तुझं माझ्याशी भांडूण चिडून माझ्या मिठीत शिरणं
खूप बोलणं, मध्येच गप्प होऊन मला न्याहाळण
माझ्या मनाला तुझं लाडिक रिझवण खरंच मला खुप आवडत
तूच माझा श्वास, तूच भास
व्याकुळ या काळजाला लागला आहे आता फक्त तुझा ध्यास
तुझं माझ्या सोबत असणं मला हव हवसं वाटतं
तुझ्यासोबत घालवलेला
प्रत्येक क्षण पुन्हा जगावसं वाटतं ...
तू माझ्या सोबत असला की आयुष्य खूप छान वाटतं
उनाड मोकळ एक रान वाटतं
सदैव मनात जपलेल पिंपळपान वाटतं...

