तुला भेटण्यासाठी जीव तरसतो
तुला भेटण्यासाठी जीव तरसतो
तुला भेटण्यासाठी जीव तरसतो
मला तु दिसली की लाल गुलाब
उमलल्या कळीसारखा वाटतो......
रोज रोज तु वाट पहात बसती
शंकराच्या मंदिरात तूझी आल्याची
चाहूल लागताच मनाची घालमेल
सुरू होती....
काय देवाला सारखा नमस्कार करती
सारी गल्ली आपल्या जोडीला पाहुन जळती
तु पाणीपुरी खायला चल
म्हणती आपल्या दोघाना बघून
लोकांना आईस्क्रीम सुध्दा तिखट लागती.....
तुला माझ्या घरीं घेऊन जाऊ म्हणती
साऱ्या बाया माझ्या घरीं तुझ्या नावांनी
पणती पेटवती.माझी आई तुझ्या प्रेमात
आहे म्हणून अगरबत्ती ओवळती.
माझे मिञ तुझ्या भावाला सुगंध पोहचून
धुपाच्या धुराची आग डोळ्यात पाणी
आणती.....
तुला फिरायला घेऊन चल बोलती
ट्रॅफिक पोलीस तुला विचारून
पावती करती. घरातून घेतलेली
माया हॉटेलमध्ये जमा होती वर
तूंच सांगती असली कसली तुझी नकली
पणवती......
मला भेटून सुद्धा तू न भेटल्यासारखी
तु वडापाव खाऊन मलाच मिरच्या चारती
येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेज च्या पोराच्या
काना नाका तोंडातुन जाळ न धूर संगच काढती....
तुला भेटण्यासाठी जीव तरसतो
मला तु दिसली की लाल गुलाब
उमल्लया कळीसारखा वाटतो......
रोज रात्री जागरण करून hi
मेसेज करती माझी आई तुला
सठवी भवानी झोपु देत नाही
म्हणून कडकडा तिच्या नावाने
बोटं मोडती त्यांची सासु सकाळ
संध्याकाळ उठता बसता तिची
दिस्ट दिवसातून पाच वेळा उतरून
टाकती .......
तुला गावातून बुलेट वर नेताना
सगळी पोर रागाने बघती. तरी
तुझा हट्ट तु पूर्ण करण्यात मला
माझा खिसा रिकामा करायला
भाग पाडती.एक किस दे बोललो
तर आजूबाजूची लोकं पाहती
असा बहाणा करून चल हट्ट
करून बाजूला करती....
तुला कुठे नेऊ म्हटलं तरी अवघड आहे
का गावातली टवाळ खोर मार्गावर तळ
ठोकून दिवस रात्र पारा करत आहे.......
तू मलाच ऑर्डर सांगती चिकन बिर्याणी
आणायला बोलती.पार्सल swigy वाली
दारात येती.ही फोन करून तु किती छान
आहे बोलती बर्फ वितळल्या सारखी
मला घायाळ करून लॉटरी लागल्यासारखी
सोड तिचा निकाल बारावीचा नापास झाल्यासारखी
बोंबाबोंब सांगत सुटती.....
घरची म्हणाली तु किती वर्षे एकाच वर्गात बसंती
माझा प्रियकर जो पर्यंत हा म्हणत नाहीं तो पर्यंत
बारावीचा शिक्षक बदला तरी त्याच वर्गात दिसती
काय करावं आईबाबा नी हीची कशी गाऊ किर्ती
घराजवळ दिसू त्यांची एकदाचं चांगली करते आरती......
प्रियकराची दहावी नापासची भरती घरची
त्याच्या नावानी शेणाच्या गोवऱ्या थापती
जेवणं म्हणलं की आमची आई तव्यासारखी
माझ्या वर तापती वर बोलती. सोड आता
तरी त्या टवळी चा नाद नाहीं आई तुझी भावी
सून आहे असं नकोस बोलुस तिचं माझी जान
तिच्या प्रेमात चेन ठेवली सोनाराच्या दुकानात गहाण
तुझा बाप संध्याकाळी घरी आला की सांगते पहिल्या
गणपतीचा मान देऊन गाल केला महान.....
शेवटी तुला भेटण्यासाठी जीव तरसतो
मला तु दिसली नाहीं गुलाब सुध्दा
हिरमुसल्या कळीसारखा भासतो......

