Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance

4.0  

Rakesh More

Romance

तुझ्यावर मरतोय

तुझ्यावर मरतोय

1 min
11.5K


स्माईलवर तुझ्या मी 

कविता करतोय

हृदयाच्या गाभाऱ्यातून 

तुझ्यावर मरतोय ||0||


मला पाहून पापण्यांचं 

उघडझाप करणं 

जवळ येता लाजून 

बाजूला सरणं 

नजरेत तुझं सौंदर्य 

पुरेपूर भरतोय 

हृदयाच्या गाभाऱ्यातून 

तुझ्यावर मरतोय ||1||


गालावर हसतांना 

खळी खुलावी 

निरागस कोमल जणू 

कळी फुलावी 

साधेपणावर मी 

काळीज हे हरतोय 

हृदयाच्या गाभाऱ्यातून 

तुझ्यावर मरतोय ||2||


दुनियादारी चा 

गंध नाही 

स्वछंद जगणं 

काही बंध नाही 

हृदयात प्रेमाचा 

रस पाझरतोय 

हृदयाच्या गाभाऱ्यातून 

तुझ्यावर मरतोय ||3||


मितभाषी असली तरी 

नजर बोलते 

हृदयातली सारी 

गुपितं खोलते 

प्रत्येक क्षणी मी 

तुझ्याकडे सरतोय 

हृदयाच्या गाभाऱ्यातून 

तुझ्यावर मरतोय ||4||


हाताला हाताचा 

स्पर्श होता 

दुरावा दाखवतेस 

खोटा खोटा 

कल्पनेत तुझा हात 

हाती धरतोय 

हृदयाच्या गाभाऱ्यातून 

तुझ्यावर मरतोय ||5||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance