तुझ्यात हरविते मी
तुझ्यात हरविते मी
तुझ्यात हरवते मी जेव्हा
मी न माझीच बघ उरते
सख्या एकरूप तुजसंगे
काया माझी ही बहरते
बांधुनी प्रेमधागे तुजसवे
गुंफिले तुझ्यातच हे मन
नको मजला दुसरे काही
तृप्त झालेय माझे हे तन
कैवल्याचं चांदणं सख्या
फुलवूया दोघेही अंगणी
बनुनी राधा तुझी मुरारी
वास हृदयाच्या कोंदणी
गातोस का तू मजसाठी
मंद मंजुळ हे मुरलीचे सूर
तुज प्रीतीने माझ्या सख्या
उडून जाई माझा राग दुर
साथ अशी जन्मोजन्मीची
राहु दे सख्या मला तुझीच
मिलनाची ही घडी समिप
मी ना राहिले बघ माझीच

