तुझ्याच करिता
तुझ्याच करिता
माळले जरी नाही मी
फूल तुझ्या गजऱ्यात कधी
मनाचे पुष्प मात्र
होते तुझ्याच करिता
शब्द जरी एकही
उच्चारले मी नाही
गीत माझे मात्र
होते तुझ्याच करिता
नव्हती जरी प्रतिमा तुझी
तेव्हा डोळ्यात माझ्या
नेत्राचे आरसे होते
मात्र तुझ्याच करिता
वरून जरी निःशब्द
तुला दिसत असलो मी
आतून आक्रंदत
होतो तुझ्याच करिता
दुबळा जरी मी
कधीच नव्हतो
डोळ्यांच्या नद्या
वाहत होत्या तुझ्याच करिता

