STORYMIRROR

Manda Khandare

Romance

3  

Manda Khandare

Romance

तुझ्या सोबत

तुझ्या सोबत

1 min
219

हसणे तुझ्या सोबत, 

रडणे तुझ्या सोबत

भावनांचे खेळ सारे

खेळणे तुझ्या सोबत


असणे तुझ्या सोबत

नसणे तुझ्या सोबत

नशिबाचे भोग सारे

भोगणे तुझ्या सोबत


चालणे तुझ्या सोबत

धावणे तुझ्या सोबत

मनीचे विश्व जिंकले सारे

जिंकणे तुझ्या सोबत


हरणे तुझ्या सोबत

गावणे तुझ्या सोबत

सप्तरंग मिळाले सारे

मिळणे तुझ्या सोबत


कळणे तुझ्या सोबत

वळणे तुझ्या सोबत

प्रेमाची बंधने सारी

बांधणे तुझ्या सोबत


रुसणे तुझ्या सोबत

तुटणे तुझ्या सोबत

मनी भाव जुळले सारे

जुळणे तुझ्या सोबत


विझणे तुझ्या सोबत

जळणे तुझ्या सोबत

अनंतात विलिन सारे

विरणे तुझ्या सोबत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance