STORYMIRROR

Yeshoda Patil

Romance

4  

Yeshoda Patil

Romance

तुझ्या रूपाचं चांदणं

तुझ्या रूपाचं चांदणं

1 min
305

तुझ्या रूपाचं चांदणं

ज्याच्या वरी मन जडे

ऊतू जातय लावण्य

मनी वाजती चौघडे


तुझ्या रूपाचं चांदणं

दारी घालतात सडे

उजळूनी घर जाई

मनी मानसी आवडे


तुझ्या रूपाच चांदणं

साथ त्याची अवखळ

झुळुझुळु उठताती

आठवांचे ग मोहोळ


तुझ्या रूपाचं चांदणं

मन लागलं झुरणी

गोऱ्या देहावर शोभे

कंच हिरवी पैठणी


तुझ्या रूपाचं चांदणं

दारी फुलली तुळस

फुलारली चाफेकळी

तुझ्या सानिध्याचा भास


तुझ्या रूपाचं चांदणं

झुंजुमुंजु झाल्या दिशा

तुझं लावण्य टिपाया

बघ शोधतो आडोसा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance