STORYMIRROR

Kirti Borkar

Romance

4  

Kirti Borkar

Romance

तुझ्या प्रीतीचा झरा

तुझ्या प्रीतीचा झरा

1 min
422

तुझ्या प्रीतीचा झरा

वाहतो का असा मंद?

तुझ्या प्रेमात वाहणे

हा एवढाच माझा छंद..


तुझ्या प्रेमाच्या रंगात

अजूनही रंगते आहे

हरवून जाते प्रीती

या छंदात दंगते आहे..


तुझ्या या हृदयात

हळूच वसते आहे

प्रेमात तुझ्या स्पर्शाने 

गालात मी हसते आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance