STORYMIRROR

Giriraj Barve

Romance

2  

Giriraj Barve

Romance

तुझं ते हसण गं

तुझं ते हसण गं

1 min
14K


पाण्यापेक्षाही खळखळून तुझं ते हसण गं

फुलापेक्षाही नाजूक तुझं ते लाजणे

कोकिळापेक्षाही गोड आवाजात तुझ ते गाणं

मला हवी आहे साथ तुझी....

तुला विसरायचं म्हणलं तरी नाही विसरू शकत मी

पण

आज कळलं ग मला

आपले वाटणारे सगळे आपले नसतात

तुझ्यावर इतकं प्रेम करतो

जितकं या जगात कुणावर केलं नाही.....

तू दूर असलीस तरी माझ्या आठवणीत तुझ्याशिवाय कुणीच नाही....

हसतेस एवढी छान की हसायला शिकवलस

गातेस इतकं छान की गुणगुणायला शिकवलस

तुझं स्मितहास्य असलं तर अस वाटत

या फुलांची काही गरज नाही....

तुझा आभास असला तर स्वप्नांची गरज नाही

तुझा आवाज असला तर स्वरांची गरज नाही

तू असलीस सोबत की ह्या जगाचीही गरज नाही....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance