STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance

3  

Shekhar Chorghe

Romance

तुझी नवी वाट शोधण्यासाठी

तुझी नवी वाट शोधण्यासाठी

1 min
26.7K


आज तू येशील का?

म्हणून मी वाट पाहतोय 

तेही या अशा रम्य सायंकाळी 

धरतीवर नुकताच पहिला पाऊस पडलाय 

आसमंत दरवळतोय,

आभाळात तांबूस ऊन पडलंय 

अन् त्याला छटा आलीय 

सप्तरंगांची 

सार्या आठवणी डोळ्यांत जमा झाल्यात 

तुझी वाट पाहून,

अशा या सायंकाळी 

मी अता शांत होतोय 

झोकून देतोय स्वतःला 

नदीच्या प्रवाहात 

अन् तरंगत जातोय 

हिरव्या तृणासारखा 

अता पावसाची वाट पाहतोय 

त्याच्या थेंबांत भिजण्यासाठी 

कारण जसं काळोख्या रात्री 

झर्याचा आवाज येतो 

अगदी तसाच झरा बनायचंय मला 

तुझ्या निर्झरासमान डोळ्यातं 

म्हणूनच अता मी सोडून देतोय 

स्वतःला अन् या डोळ्यांना 

या पहाडांत, या जलधारेत 

तुझी नवी वाट शोधण्यासाठी...

       


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance