STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Romance

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Romance

तुझी मिठी

तुझी मिठी

1 min
423

विसरते रे मी सारं...

तुझ्या त्या रेशमी बाहुपाशात....


जागा ती माझी हक्काची...

आश्वस्त होण्याची..

माझं मी पण विसरून,

विरघळून जाण्याची..


काय नसतं रे तुझ्या त्या मिठीत?

 एक सुरक्षितता.....

कधी आई वडिलांच्या मायेची ऊब...

तर कधी भावा बहिणीचे निरपेक्ष प्रेम...

तूही शिरतोस की कुशीत माझ्या..

लहानग्या लेकरागत कधी..

अन् मिळतो आनंद नव्याने

तुझी आईसुद्धा झाल्याचा..


अनुभवलेत रे 

किती तरी क्षण धुंदीचे..

सजलेले सोहळे प्रेमाचे...

माझे मी पण गळून अद्वैत कळण्याचे..

फक्त नी फक्त..

तुझ्याच साखर मिठीत, तुझ्याच साखर मिठीत...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance