तुझी हुरहर
तुझी हुरहर
तुझा एक उसासा
माझ्या अंतरीचा दिलासा
तुझी हलकेच चाहूल
माझ्या मनी उठलेले काहूर
तुझ्या ओठावरचे बोल
मला करतात अबोल
तुझ्या पैंजनांची रुणझुण
वाढवतात माज्या स्पदनांची कुणकुण
तुझा दाटलेला ऊर
माझ्या मना लागली हुरहूर

