STORYMIRROR

Prajakta Waghmare

Tragedy

4  

Prajakta Waghmare

Tragedy

तुझी आठवण आली ना

तुझी आठवण आली ना

1 min
559

 स्वतःपासून माझे अस्तित्व दूर कुठेतरी जाते

     तुझ्याच विचारात मग्न होऊन

     गर्दीतही एकांत शोधत भटकंती करते

     तुझी आठवण आली ना की माझं अस होते


     माझं मलाच काही कळेनासे होते

     सर्व काही विसरून वेडेपिसे होऊन

     हे वेड मन फक्त तुलाच साद देते

     तुझी आठवण आली ना की माझं अस होते


     तू जवळ नसतानाही तुझे अस्तित्व भासते

     दुरावा असहाय होत राहतो मग

     विरहाचे दोन क्षण ही मनाला तडफडवते

     तुझी आठवण आली ना की माझं अस होते


   सतत हसमुख असणाऱ्या चेहऱ्यावर शांतता पसरते

      सार काही नको नको होऊन

      नजर फक्त नि फक्त तुलाच शोधते

      तुझी आठवण आली ना की माझं अस होते...    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy