तुझाच संकेत
तुझाच संकेत
तुझ्या प्रेमाचा मनावर असा
परिणाम झाला
तुझाच संकेत निसर्गाच्या
चराचरात मिळाला || 0 ||
तुझं सतत भोवताली असणं
तुझी सवय करून गेलं
माझ्या हृदयात तुझं प्रेम
नकळत भरून गेलं
वाटतं ओरडून सांगावं
नेहमीच्या जगाला
तुझाच संकेत निसर्गाच्या
चराचरात मिळाला || 1 ||
तुझ्या स्पर्शात वेगळीच एक
जादू आहे
माझा आता मनावर कुठे
काबू आहे
मी उरलो आता फक्त
निमीत्तमात्राला
तुझाच संकेत निसर्गाच्या
चराचरात मिळाला || 2 ||

