तुज सांगू कसे
तुज सांगू कसे
तुज सांगू कसे
कळत नाही मजला
विचार मनी येता
वाटतंय की आभाळ फाटल
खूप वाटायचं मला
की तू माझाच असावा
सोबत तुझी असताना
बेधुंद होऊन जायचं
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
फक्त तुझी होऊन जगायचं
तासनतास फक्त तुझ्याशी बोलायचं
फक्त अन् फक्त तुझीच होऊन राहायचं

