Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

pranav kode

Romance

1.8  

pranav kode

Romance

तुच ती...

तुच ती...

1 min
650


सर्वात आधी पाहिलं तिला

तेव्हा वाटलं कुठेतरी पाहिल्यासारखं

पण नंतर कळलं ज्याला रोज बघतो

त्या चंद्रापेक्षाही कुणी असतं सुंदर


हल्ली वर्गात पाऊल ठेवताच

माझी नजर आधी तिलाच शोधते

ती एकच मुलगी वर्गात फक्त

जीन्सवरही टिकली लावते


पहिला दुसरा बेंच तसा

रोजच तिचा ठरलेला असतो

टिकली नाहीच तर कधीतरी मग

कुंकवाचा ठिपका तरी नक्कीच असतो


बोलायचं तर असतं तिच्याशी पण

हिम्मतच काहीकेल्या होत नाही

सगळे पर्याय संपल्यावर शेवटी

कवितेला पर्यायच उरत नाही


लिहायचं म्हटलं तिच्याबद्दल तरी

फक्त तिची स्माईल आठवते

तिच्या आठवणीत प्रत्येक ओळ मग

तिच्यासारखीच गोड लाजते


नंबर तिचा मिळवण्यासाठी तर

अख्खा ग्रुप मी पालथा घातलेला

शेवटी हातावरचा तीळ तिच्या

चुकून एका फोटोत दिसला


तो तीळ उजव्या हातावरचा

म्हणजें खरचं सौंदर्याची खूण आहे

जसा चंद्र असतोच मुळात सुंदर

म्हणूनच त्यावर डाग आहे


नाजूक गुलाबी ओठांसमोर

ते रंगही लिप्स्टिकचे फिके पडतात

तुझ्या नकळत डोळेही तुझे

मला सतत वर्गात खुणावत असतात


इवल्याश्या उंचीतली ती इवलीशी टिकली

सुंदर चेहरा खुलून दिसतो

रंग नसतात सगळेच सुंदर

पण तुला कोणताही उठूनच दिसतो


हरवून जातो मी तुझ्या सौंदर्यात

तरी भेट आपुली दुरूनच होते

नजर भिडते नजरेला पण

वाचा तरीही मुकीच असते


फक्त नजरेच्या शब्दांनी असा

मी कसा तुला ओळखू शकेन

बोलूया का भेटून दोघंच कधीतरी

म्हणजे आणखी व्यवस्थीत लिहू शकेन....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance