तुच हृदय मंदिरी
तुच हृदय मंदिरी
तुच हृदय मंदिरी
दिस रातिच्या संगती
आस माझ्या अंतरी
भाव मनी या सोबती
तुच हृदय मंदिरी ....
आस माझ्या अंतरी
तुच हृदयी मंदिरी
कथा काल परवाची
गुंजे काहुरी मंजिरी
राधा बावरी कृष्णाची
सय गहिरी अंतरी
आस माझ्या अंतरी
तुच हृदय मंदिरी
भाव असा तुझ्या ठायी
भोळसर प्रितसरी
बरसुनी गेली कधी
नाही कळली साजिरी
आस माझ्या अंतरी
तुच हृदयी मंदिरी
चिंब ओल्या भावसरी
आल्या कुठुनशा सरी
सांज येता या अंगणी
याद झरे गालावरी
आस माझ्या अंतरी
तुच हृदयी मंदिरी
आसवांची ती काहिली
मन अधिर कुंज री
आज क्षितिजा संगती
गुंज नभीच सांगे री
आस माझ्या अंतरी
तुच हृदयी मंदिरी
झाली मीरा ही दीवानी
कृष्णमाया वसे खरी
विसरुनी जग रित
वाजे कृष्णाची बासरी
आस माझ्या अंतरी
तुच हृदयी मंदिरी

