तु म्हणजे...
तु म्हणजे...
तु म्हणजे ,
सागराची उधाणलेली लाट,
अंतरंगी किनाऱ्याला ओलावणारी ,
मऊशार रेताळ वाट ...
तु म्हणजे ,
बेभान शिवारी वाहणारा वारा,
अंगाला झोंबुनी गारवा,
गोड गुलाबी उठणारा शहारा ...
तु म्हणजे ,
निरागस वेडी प्रिती ,
आनंद मनात भरूनी,
का? कुणास ठाऊक हिरावून घेण्याची भिती...
तु म्हणजे ,
भावनांनचे अपहरण,
मन माझे तुझ्या ताब्यात ,
तुच करशील तारण...
तू म्हणजे ,
जगण्याला मिळालेली दिशा,
तुझ्याशिवाय आता ,
उरली नाही कोणतीच आशा...

