ठोका काळजाचा चुकला
ठोका काळजाचा चुकला
पाहिले स्वप्न मोठे
केले पूर्णही ते नेटाने
मातृभूमीच्या रक्षणासी
सोडिले घरदार त्याने
कर्तव्यदक्ष राहूनी
लढला वीर जोमाने
शत्रुशी झुंजला शर्थीने
पण घाला घातला काळाने
वीर जवान मातृभूमीचा
रणांगणी धारातीर्थी पडला
आला लपेटून तिरंग्यात
पाहुनी ठोका काळजाचा चुकला
फोडिला हंबरडा मातेने
ओरडे जीवाच्या आकांताने
प्रिय पुत्र तो शहीद झाला
ठोका तिच्या काळजाचा चुकला
