ठिक चाललंय सगळं
ठिक चाललंय सगळं
ठिक चाललय सगळं..
ठेविले अनंते तैसेची राहावे
हे एकदा मनाने मान्य केले की
सगळं ठिकठाकच असतं
फक्त आयुष्य उध्वस्त झालय
फक्त दुःखाला सहन करावं लागतंय
सुखाच्या एक्स्प्रेस हायवेवर दुःखाचा
टोल भरावांच लागतो
हसण्यासाठीही इथे कर्ज मिळते
सगळ्यांनाच ते परवडत नाही
कसं चाललंय म्हणल्यावर
फक्त ठिक चाललंय असंच
म्हणावं लागतं
उत्सव, सोहळे बंद झाले तरी
जगायला मिळतंय, श्वास घ्यायला
मिळतोय हे काय कमी आहे
म्हणून म्हणायचं ठिक चाललंय सगळं.
