ठाव
ठाव
नको सोडू आधा, असा डाव राधा
मला लोचनी तू, नि बोलाव राधा
तुझी लांब वेणी, तिथे मोगरा ही
मलाही लटांचा, लळा लाव राधा
नसे आज ओठी, तुझ्या नाव माझे
नि कोठे पुसावे, असे घाव राधा?
झरे प्रीतिचे तू, ध्वनीबद्ध केले
विनाशब्द केला, नि वर्षाव राधा
जरी काढली मी, तुझी काल खोडी
मनाचा तुझ्या त्या, नसे ठाव राधा

