STORYMIRROR

Deepa Vankudre

Tragedy

3  

Deepa Vankudre

Tragedy

टाहो आक्रांत मनाचा

टाहो आक्रांत मनाचा

1 min
506

तिची कोवळीशी काया,होती दिसत मलूल,

पदरात झाकलेले,कृश शरीराचे मूल!

तिच्या कपाळीचं कुंकू, वार्धक्यात सुकलेलं, 

पौगंडाने स्वातंत्र्यास,बिजवरा मुकलेलं!

स्वप्नातला इंद्रधनु,आसवात विरलेला,

प्रकाशीत होण्या आधी,आशा दीप विझलेला!

फुल गेले कोमेजून, यौवनाच्या जाणीवांचे,

बीज कळीत अकाली,झिरपले मातृत्वाचे!

घाई कशाला लग्नाची?टाहो आक्रांत मनाचा!

सांगा कसा झेलायचा,भार मुक्या यातनांचा!

स्वत्व हरवले आहे,आता हवे शोधायला!

झुंज माझ्या आयुष्याची....मीच उभी लढायला!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy