STORYMIRROR

Savita Kale

Inspirational

4  

Savita Kale

Inspirational

तरूणाई

तरूणाई

1 min
350

सामर्थ्य तू देशाचे, तूच आहे आशा

अंधार या जगीचा, बाहूत बांध तू


या रिक्त मैफिलीचे, हरवून सूर गेले

लय ताल शोधण्याचा, संकल्प आज कर तू


रात्रीस पाहा स्वप्न, तू ध्येय गाठण्याचे

स्वप्नांना सत्य करण्या दिवसा प्रयत्न कर तू


मन शिंपल्यात तुझ्या, घे ध्येय साठवूनी

मोत्यांस प्रयत्नांच्या, माळेत ओव तू


संपता संपेचना ही, रात्र जरी असे अंधारी

एक शोधाया कवडसा, आज तरूणा उठ तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational