STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

4  

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

त्रास देतो तुला

त्रास देतो तुला

1 min
246

आज चिडवायला, नाक मुरडायला

त्रास देतो तुला, चेहऱ्या राग पाहायला


का असा वागतो, काय जाणो गुन्हा

मागतो माफी मी, वागतो तो पुन्हा

बस तुला पाहण्या, आवडे जे हे मला

त्रास देतो तुला, चेहऱ्या राग पाहायला


तू अशी राबते, गाय होऊन घरी

ध्यास तो लागला, कायम तो उरी

स्वप्न एकच मना, सारं मिळोव तुला

त्रास देतो तुला, चेहऱ्या राग पाहायला


लाभली साथ ही, नव्हते ध्यानी मनी

लोटला स्वप्न सागर, उरली सुखाची गोनी

ये अशी तू जवळ, मोकळा मार्ग भावनांना केला

त्रास देतो तुला, चेहऱ्या राग पाहायला


तो असा रागाचा, चढतो काय पारा

या मनी तो पाऊस, आवडीच्या त्या गारा

साथ दे तू मला, प्रत्येक या पाऊला

त्रास देतो तुला, चेहऱ्या राग पाहायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance