तो पाऊस...
तो पाऊस...
प्रेम तू माझ्यावर कर
बघ तो पाऊस आला आहे
तुझ्या होकाराविना माझा
जीव गेला आहे....
बहरला आहे सखे
हा मौसम
का वाजेना तुझे
पैंजण छमछम
वाहत्या पाण्यासारखा
मला तू वाहून नेला आहे....
भिजले प्रेमाच्या थेंबांनी
माझे अंग
सोबत माझ्या पावसाच्या
सरी तू नां संग
तू सोडून काळ्या नभाने
माझ्यावर उपकार केला आहे.....
कडकडली तुझ्या
दूराव्याची वीज
वाटे मला माझी
आज लाज
डोळ्यातल्या पाण्याने
ही दगा दिला आहे...
तुझ्या आठवणींत भरेना
मनाचा जलाशय
देशील कधी मला
तुझ्या मिठीत आशय
भर पावसात संगम
प्रेमाविना मेला आहे....

