STORYMIRROR

Mangesh Medhi

Drama

3  

Mangesh Medhi

Drama

तो कलंदर

तो कलंदर

1 min
14.3K


गवसले वळणावर नेमीच्या

अनमोल से रत्न एक

जमले अनेक वेचून एक एक

मिरवतो कोणी हातातूनी

घडविती अलंकार काही

मांडीले प्रदर्शने काहींनी

तर समारंभे कोणी

दिपूनी गेल्या नजरा सार्‍या

वैभवे लाभल्या अवचित या !


जो तो विचारी ज्याला त्याला

कोणी सांडीले हे धन कोणाचे ?

नजरेतूनी एकची भाव

उत्तर मनात एकची प्रत्येक !


येथेच होता तो कलंदर

हसणे उधळीत हास्य खुलवीत

ओंजळ भरुनी मोती लुटीत


काय अमाप असे ते वैभव

काव्याचे हिरवे पाचू

कलेचे मोहक माणिक अस्सल

अन् प्रतिभेचे लखलखते हिरे

लेवून सारे मिरवत होता


परी दिसले ना कोणा ना पाहीले कोणी

ऐकावेसे बघावेसे कधी कोणास वाटलेच नाही

खंत ना त्याला ना फिकीर कसली

बैरागी तो कला योगी थांबला ना अडखळला

तसाच सांडत गेला पुढे


एक एक वळणा वळणावर

झोळीतील रत्ने अनमोल

हळहळती हूरहूरती पस्तावूनी आता

काय हे नशीब अन् प्रारब्ध कसे

नसताना आठवण त्याची

कौतुक करती, गौरव करती

समारंभ काय अन् गुणगान ते

कला विष्कार घेऊन नाचती


पूजा मांडूनी वंद्य मानती उराशी कवटाळूनी

त्याच्यासाठी नव्हे स्वत: साठीच

तेवढेच प्रायश्चित्त मानती

अन् तो असाच पुढल्या देशी

कलंदरीने दिलदारीने

संपत्ती आपली वाटत हिंडती


हसून फक्त एवढेच म्हणतो

तुम्हा करीताच तर हे सारे

आनंदात तुमच्या मी आनंदी

येथेच होता तो एक कलंदर !...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama