तो एक चेहरा...
तो एक चेहरा...


खुप गर्दी झाली आजुबाजूला
मन तरीही लागत नाही
तो एक चेहरा बघण्यासाठी
तैयार मी करायला काही ...
ओझरता ओझरता पदर
वाऱ्यावरूनी ओघळत राही
मी मागे मागे तरी अदुश्य
जादुगरीची या कमाल नाही ...
देवा तुझ्या दरबारी राहिला का?
सौदर्यांचा खजीना बाकी
अवतरली अप्सरा जमीनीवर
आणि शोभा दरबाराची रिती ...
तुलाही आता पश्चाताप
का? चांदणी आसमानी उतरली
मी चंद्र होऊनी फिरतो मागे
माझी शुक्राची चांदणी हरवली ...