संसार सांभाळणे
संसार सांभाळणे


नेमकं संसार सांभाळणे
म्हणजे काय हो
चारचौघात मुंडावळ्या बांधणे
आणि सारा जन्म त्याला सांभाळणे...
दोघांच्याही वाट्याला हा साज
डोलत हसणाऱ्या लटकणाऱ्या
किती सुंदर नाजुक छान
पण याच आठवण करून देतात
गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही
दिवस जरी आनंदाचा
पण आयुष्य असेच का राही
हा , गर सोबत तुमची जुळलेली
तर मात्र स्वर्ग फुलेल
आयुष्याच नंदनवन इथेच होईल
संसार सांभाळणे मग काय कठीण
दोघेही आनंदाने सातजन्म जगेल
हीच सुरवात अन् हाच शेवट असेल...