तंत्रज्ञान वरदान ?
तंत्रज्ञान वरदान ?
कर विचार मानवा
तंत्रज्ञान वरदान
इच्छा आहे जगण्याची
झाले खूप नुकसान...१
झाला माणूस माणसा
पासुनिया लांब खरा
हाती आलासी जेव्हा हा
टेलीफोन कानी धरा...२
स्मार्टफोन जादूगार
झाली ही किमया राव
समोरचा माणूसच
दिसेनासा झाला भाव...३
गळे गळ्यात आणि ह्या
टाळ्या हो हातावरच्या
आता काळाआड गेल्या
पार्ट्या ऑनलाइनच्या...४
दार दाराला खेटून
घर घराला चाळीत
प्रत्येकहो प्रत्येकाच्या
सुख दुःखात सोबत...५
आता फ्लॅट सगळेच
आले शेजारी शेजारी
बंद दाराआड गेले
विखुरले नाते दारी...६
असे तंत्रज्ञानाचे हे
तोटे तसेच फायदे
परदेशी राहूनिया
जपे मातीशी हे वादे...७
इच्छा आहे जगण्याची
तंत्रज्ञान वरदान
कर विचार मानवा
समजून नीट ज्ञान...८
