Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Abstract

2  

Manisha Wandhare

Abstract

तळ्यात मळ्यात करता करता...

तळ्यात मळ्यात करता करता...

1 min
9

तळ्यात मळ्यात करता करता,

आज पाणी नाकापर्यंत आले,

आठवता ते दिवस बालपणीचे,

जर पुन्हा ,

तळ्यात मळ्यात करता आले...

विष अमृत खेळतांनाही ,

विष अमृताचा फरक ना जाणले,

आजच्या संकटापुढे वाटते,

जीवन म्हणजे विषाला तोंड लावले ...

कुठे निवांत क्षण ओळखीचे,

आज गजबजूनी गेले ,

एक मित्र सोडला तर,

कुठे ते बालचणीचे मित्र उरले ...

तोही भेटतो किती ,

धावता पळता हाय हॅलो केले ,

कुठे ती गळाभेट जिवाची ,

सारे पुस्तकी जमा झाले ...

एक बॉल घेऊन ,

भांडायचे काही रुसले ,

आज प्रत्येकाजवळ आहे,

पण खेडाळूच ,

त्यांच्यासारखे ना राहिले...

आता आठवणीच्या कप्यातून ,

एक एक आठवणीचे पाने सांडले,

सावळून निट करता करता,

वाऱ्यावरती भोवताली पसरले ...

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract